
काही वेळातच सुरू होणार सुपर ओरियर्स मेळावा
केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, व प्रमुख नेतेकरणार मार्गदर्शन
नेत्यांच्या उपस्थीत भाजप कोआर कमिटीची सुरू आहे बैठक
सभागृहात सुरू आहेत विजयाच्या घोषणा
संतोष राऊळ ( कुडाळ)लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या संघटनात्मक आढावा बैठकीस कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साहात पाहावयास मिळाला.
दरम्यान भारतीय जनता पार्टी संघटनात्मक आढावा बैठक कुडाळ आणि कोअर कमिटी बैठक साठी भाजप नेते केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद जठार सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली,माजी आमदार अजित गोगटे,महीला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर ,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख,सुपर ओरियर्स ,बुथ कमिटी अध्यक्ष,सरपंच उपसरपंच,आदी सह असंख्य पदाधिकारी उपस्थित आहेत.












