वार्ताहर l पाली :येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाली प्रशालेचे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृती योजना परीक्षा २०२३-२०२४ या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून ९ जण जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये आले आहेत. त्यामधे यश मधुकर घडशी सर्व.५६, पायल सुरेंद्र ठीक इ.मा ७,स्वस्ती उमेश नागले इ.मा ११, सार्थक संदीप कांबळे इ.मा २४,सोनल संदेश काजरेकर इ.मा ३३,श्रुती संदीप कदम ई.डब्लू.एस ९,श्रुती योगेश कोकरे एन.टी. सी ३, गायत्री श्रीकांत पवार, यश रमाकांत गिडये सारथी शिष्यवृती प्राप्त झाली आहे. या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पालीचे प्राचार्य सुदेश कांबळे,पर्यवेक्षक नम्रता गोगटे, माजी प्राचार्य श्रीकांत पवार, प्रियदर्शनी रावराणे, रत्नागिरी मध्यवर्ती बँक संचालक रामचंद्र गराटे,शिक्षक पालक संघाचे दिनेश सावंतदेसाई,मंगेश पांचाळ यांनी अभिनंदन केले आहे.
बातमी 3
पालीतील अपूर्ण महामार्ग चौपदरीकरणामुळे ग्रामस्थ त्रस्त
वार्ताहर पाली
पाली बाजारपेठे मध्ये अनेक महिने मुंबई- गोवा महामार्गाचे काम चालू आहे.त्यात बाजारपेठे मधील सेवा रस्त्याचे चे काम चालू झाले आहे पण ते काम अपूर्ण काम असल्यामुळे सध्या धुळीचा मोठा त्रास व्यापारी,निवासी घरांना सहन करावा लागत आहे.जीव मुठीत धरून त्या रस्त्यावरून दुचाकी गाडी चालवावी लागत आहे.त्यात त्या रस्त्यावरून गाड्यांची वाहतूक होत असल्यामुळे पूर्ण रस्ता माती व धुळीने माखलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व पादचारी याना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.त्याचा त्रास दुकानामध्ये येणारे ग्राहक,स्थानिक लोक, रस्ता शेजारी असणाऱ्या घरातील लोकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय.
या रस्त्यावरून जात असताना विद्यार्थ्यांना देखील जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे,चालत जाताना बाजूने जाणारी गाडी सुद्धा त्यांच्या अंगावर माती धूळ उडवून जाते आहे. रस्त्याच्या बाजूपट्ट्या खणून ठेवल्याने वाहन व पादचारी यांना अपघाताचा धोका असून त्या भरण्याची गरज आहे तर यावर स्थानिक बाजारपेठे मधील रहिवासी आणि दुकान धारक यांनी मुंबई गोवा महामार्ग चे जी कंपनी काम करत आहे त्यांनी लवकरात लवकर सर्व्हिस रोड वर डांबरीकरण करून द्या अशी मागणी करत आहेत व त्यातच गटारे पूर्ण झाली नाहीत त्यामुळे रस्त्यावर चालत जाणारी मुले,वयस्कर व्यक्ती,किंवा अन्य कोणाचा अपघात झाला तर कंपनी जबाबदार राहणार का हा देखील जाब विचारला जात आहे.त्यामुळे सेवा रस्त्याचे डांबरीकरण व गटारे पूर्ण न झाल्यास आंदोलन करू असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.










