भाजप नेते नाम.नारायण राणे यांची उमेदवार अर्ज भरण्यासाठी हजारो कार्यकर्ते रत्नागिरीकडे रवाना

 कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह

संतोष राऊळ (रत्नागिरी)

भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज आज रत्नागिरी येथे दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळत आहे. हा उमेदवारी आर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग,रत्नागिरी तील दोडामार्ग ते चिपळूण येथून महायुतीचे कार्यकर्ते हजारो वाहने घेवून रत्नागिरी कडे रवाना झाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटनिहाय वाहने निघत आहेत. भारतीय जनता पार्टी कडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यासाठी शेकडो वाहने पक्षाचे झेंडे लावत रत्नागिरी कडे रवाना झाली आहेत.