कोकण रेल्वे मार्गावर २३ एप्रिलला अडीच तासांचा मेगाब्लॉक

 

खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा ३ एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामध्ये सावंतवाडी रोड ते दिवादरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाडीचा समावेश आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रायगड जिल्ह्यातील करंजाडी रत्नागिरीतील चिपळूण दरम्यान दुपारी ६ १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटे असा अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणारी कोईमतूर -जबलपूर विशेष गाडी (०२१९७) ही . २२ एप्रिल रोजी प्रवास सुरु होणारी गाडी रत्नागिरी ते कामथे दरम्यान १ तास १० मिनिटे रोखून ठेवली जाणार असून, . २३ रोजीची सावंतवाडी रोड ते दिवा दरम्यान रोज धावणारी एक्स्प्रेस गाडी (१०१०६) सावंतवाडी ते रत्नागिरी दरम्यान १ तास ४० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

या दोन गाड्यांशिवाय लो. टिळक टर्मिनस ते तिरुअनंतरपुरम दरम्यान धावणारी (१६३४५) नेत्रावती एक्स्प्रेस कोलाड ते वीर स्थानकांदरम्यान ५० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.