लांजा (प्रतिनिधी) लांजा शहरा नजिकच्या देवधे येथील सेंट अँन विद्या निकेतन या शाळेत नुकताच समर कॅम्प पार पडला. शाळेच्या परीक्षा संपल्या नंतर मुलांना वेध लागतात ते म्हणजेच समर कॅम्पचे.असाच एक समर कॅम्प पार पडला सेंट अँन विद्या निकेतन, देवधे या शाळेच्या कॅम्पसमध्ये.या समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांमधील संघभावना, धैर्य, साहस, वेळेची व्यवस्थापन, शिस्त, संयम, भीतीवर मात, चिकाटी या गुणांना चालना मिळावी याकरता ऍडव्हेंचर एक्टिविटी घेण्यात आल्या.

या एडवेंचर ऍक्टिव्हिटी साठी जिद्दी माउंटेनिअरिंग जिल्हा असोसिएशन रत्नागिरी चे अरविंद नवले आणि त्यांची टीम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. झिप लाईन, लेडर क्लायबिंग, वॉल क्लायबिंग, रॅपलिंग, रायफल शूटिंग अशा ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता वाढीस लागावी, यासाठी ग्लास पेंटिंग, टी-शर्ट पेंटिंग, स्टोन पेंटिंग, कागदांची वेगवेगळ्या प्रकारची फुले बनवणे असे विविध उपक्रम घेण्यात आले.
या कॅम्पमध्ये लांजा शहरातील विविध शाळांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर समर कॅम्प यशस्वीतेसाठी सेंट अँन विद्यानिकेतन देवधे या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर बिना जोसेफ तसेच त्यांचा शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.











