‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’साठी भाजपकडून रवींद्र चव्हाण यांची निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

 

२७ एप्रिल ते ५ मेपर्यंत त्यांना मतदार संघातच मुक्काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवस ना. चव्हाण हे दोन्ही जिल्ह्यांत विशेष लक्ष ठेवणार आहेत. भारतीय जनता पार्टीने तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची रत्नागिरी-सिंधुदुर्गचे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करून विशेष जबाबदारी दिली आहे.