रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात क्रीडा विभागांतर्गत राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटात सोहम गोसावी विजेता व उपविजेता आर्यन वाघधरे आणि मुलींच्या गटात विजेती ईश्वरी पवार आणि उपविजेती गार्गी चव्हाण ठरली.
क्रीडा विभाग प्रमुख प्रा. वैभव घाणेकर यांनी प्रास्ताविक केले. प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांच्या हस्ते क्रीडा साहित्यांचे पूजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वसुंधरा जाधव, क्रीडा विभाग विद्यार्थी प्रतिनिधी राज वाडेकर तसेच प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वैभव कीर यांनी केले. प्रा. मिथिला वाडेकर यांनी आभार मानले.












