शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, व ऱाष्ट्रवादी पवार गटास आमदार योगेश कदम यांच्याकडून मोठा धक्का.
मंडणगडl प्रतिनिधी : तालुक्यातील जनमत सत्ताधारी पक्षांचे विरोधात असल्याच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षातील स्थानीक कार्यकर्त्यांच्या मोठ्या दाव्याला लोकसभा निवडणुक मतदान होण्या अधीच आमदार योगेश कदम यांनी फोल ठरवले आहे. 30 एप्रिल 2024 रोजी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षांचे सरपंच पदासह विविध जबाबदाऱ्या सांभणारे पालवणी, पाले, कळकवणे, कोन्हवली, लाटवण या गावातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमास माजी सभापती आदेश केणे, रामदास रेवाळे, अमिता शिंदे, अस्मिता केंद्रे, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, अनंत लाखण, चेतन सातोपे, दीपक मालुसरे, सुरेश दळवी, सिध्देश देशपांडे, प्रतिक पोतनीस, इरफान बुरोंडकर, अनंत शिंदे, अनिल रटाटे, विकास पवार, संतोष पार्टे, संजय शेडगे, यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षात झालेल्या फुटीमुळे ग्रामिण भागात जनता सत्ताधाऱ्यांवर प्रामुख्याने शिवसेनेवर नाराज असल्याने लोकसभेच्या निवडणुकीतही त्याचा फटका महायुतीस बसणार आहे असा दावा महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्षांचे कार्यकर्त्यांकडून सातत्याने केला जात असताना महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षांचे पाच गावातील मतदान आपल्याकडे वळवून शिवसेनेने चांगलाच धक्का दिला आहे. दरम्यान विरोधकांचे दाव्यात कोणतेही तथ्य नसून मतदार शासनाचे विरोधात नव्हे तर शासनाच्या विकासाच्या धोरणाच्या बाजूने असल्याचे प्रतिक्रीया आमदार योगेश कदम यांनी या कार्यक्रमांनंतर दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमदेवारास तालुक्यातून दहा हजारांचे मताधिक्य मिळवून देणार असल्याची भुमीका यावेळी मांडताना विधानसभा निवडणुकांपुर्वी तालुक्यातील अनेक गावे राज्यातील शिंदे सरकाराच्या कारभारावर विश्वास ठेवून शिवसेनेत सामील होणार असल्याचेही सांगीतले.









