
भाजपा महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांचा घणाघात
रत्नागिरी | प्रतिनिधी :स्वार्थ साधण्यासाठी विरोधक जाती पातीचे राजकारण करत आहेत गैरसमज पसरवत आहेत, मात्र पोटाला कोणतीही जात नसते, आपल्याला चांगले आयुष्य जगता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी माणुसकी हा धर्म म्हणून काम करत आहेत, म्हणूनच त्यांच्या पाठीशी उभे रहा आणि प्रगत भारतात कोकणही दिसावं म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून द्या असे आवाहन भाजपा महायुतीचे उमेदवार ना नारायण राणे यांनी केले.
उद्यम नगर येथे झालेल्या मिर्जोले शिरगाव गटाच्या मेळाव्यात तर बोलत होते. ना. राणे म्हणाले, ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवते. मोदी गेली दहा वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत. मोदींनी जे दहा वर्ष काम केलं आहे त्यामुळे देश प्रगती कडे गेला आहे. आपली अर्थव्यवस्था सुधारली आहे. 2030 ला आपण जागतिक अर्थव्यवस्थेला तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार असा निर्धार मोदींनी केला आहे. मोदींनी महिलांपासून अल्पसंख्याकांच्या विकासासाठी प्रत्येकासाठी योजनांची घोषणा केली असून त्याचे तळागाळापर्यंत अंमलबजावणी होत आहे. या योजनांची घोषणा करताना मोदींनी कधीच जात-पात पाहिलेली नाही, देशाची प्रगती ही मोदींमुळे झालेली आहे. या वेळेला मोदींनी 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामध्ये आपल्या कोकणचा खासदारही असावा यासाठी ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे असं प्रतिपादन ना. नारायण राणे यांनी केले.
स्थानिक खासदार असा हवा ज्याला विकासाची माहिती हवी. आज विविध जाती धर्माचे नागरिक इथे उपस्थित आहेत. मी गेल्या ४०वर्षात कोणत्याही विकास कामांमध्ये जातपात आणली नाही. त्याचं राजकारण केलं नाही. मी सिंधुदुर्गचा सुपुत्र आहे. त्यामुळे या कोकणावर माझं प्रेम आहे. या कोकणाचा विकास व्हावा यासाठी मी कटिबद्ध आहे. इकडे काम करताना इकडचा विकास करताना कोणत्याही आपलं जीवनमान उंचावण्यासाठी इथे विकास हवा आहे, आपलं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे तरच आपण उत्तम जीवन जगू शकतो. आपल्या आयुष्यात आधुनिक तंत्रज्ञान आलं पाहिजे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. तेही कोणतीही जात पात मानत नाहीत माणुसकी हाच त्यांचा धर्म आहे. तर महिला युवक शेतकरी आणि गरीब या चार जातीचे मानतात तर कोकणामध्ये माझ्यासह पालकमंत्री उदय सामंत,बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आणि शिवसेना नेते किरण सामंत आम्ही सर्वच जण टीम म्हणून या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. कार्यरत आहोत. मात्र ज्या कोकणाकडे उद्धव ठाकरे मतांची मागणी करत आहेत त्या कोकणासाठी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. खासदार म्हणून दहा वर्षात त्यांनी काय केलं काम केलं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. प्रगतीचे कोणतेही मुद्दे त्यांच्याकडे नाहीत म्हणून फक्त पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते टीका करतात पण या टीकेमध्ये कोकणासाठी भविष्यात कोणते व्हिजन नाही, कोणत्या योजना राबवल्या जातील याबाबत ते काहीही बोलत नाहीत. मोदींना देशाला प्रगतीपथावर न्यायचा आहे, ज्या वेळेला मोदी हा देश विकसित करत असतील त्या वेळेला त्यांच्यासोबत इथला तुमचा हक्काचा खासदार संसदेत हवा याचसाठी, या भागाचा कायापालट व्हावा यासाठी मला तुमचा खासदार म्हणून निवडून देण्यासाठी तुमचं अमूल्य मत द्या असा आवाहन या वेळेला नारायण राणे यांनी उपस्थित नागरिकांना आणि ग्रामस्थांना केलं.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले महायुती ही जात पात न मानता काम करते. प्रत्येक धर्माचा विकास झाला पाहिजे असं काम करते इथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याचं मतांमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी आता आपली सर्वांचीच आहे. देशाचा नेतृत्व ठरवणारी ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना तेथे आपला हक्काचा आवाज असावा यासाठीच महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना आपण निवडून देणं आवश्यक आहे. आपले विरोधक जातीपातीचे राजकारण करून मोदींनी केलेल्या कायद्याचा विपर्यास करून आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र प्रत्येकाने या कायद्यांचा अभ्यास करावा असं मी त्यांना सांगेन. मी नेहमीच मुस्लिम समाजाच्या सुखदुःखात त्यांच्या सोबत असतो, याही पुढे त्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध असेन. शिरगाव मिरजोळे या भागातील जनतेसाठी अनेक विकास काम याही पुढे केली जाणार आहेत. त्यांचे अनेक प्रश्न सोडवले जाणार आहेत. यासाठी महायुती इथे निवडून आली पाहिजे म्हणूनच ना. राणे यांना भरघोस मताने आपण मतदान करावं असा आवाहन उदय सामंत यांनी या वेळेला केलं.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते किरण सामंत ऍड विलास पाटणे, बाबू म्हाप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत रज्जाक काझी विनया गावडे कांचन नागवेकर फरीदा काजी सरपंच शिरगाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.











