श्रीभावई देवी मंदिर जिर्णोध्दार वर्धापनदिन १३ मे २०२४

 

सालाबाद प्रमाणे श्रीभावई देवी मंदिर जिर्णोध्दार ३० वा वर्धापनदिन सोहळा समस्त मालडी ग्रामस्थ आणि श्रीभावई देवी भक्तगण यांच्यासह मोठ्या उत्साहात आणि भरगच्च कार्यक्रमासह श्रीभावई देवी मंदिर प्रांगण मालडी येथे सोमवार दिनांक १३ मे २०२४ शके १९४६ वैशाख शु.६ रोजी आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे .तरी या धार्मिक सोहळ्यास भाविकानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून श्रीभावई देवीच्या आशीर्वाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही मालडीवासीयांची मनोमन ईच्छा आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा

सकाळी ८.३० वाजता देवीचा अभिषेक

सकाळी ९.३० वाजता महाआरती

सकाळी १०.३० वाजता देवीची ओटी भरण्यास प्रारंभ

दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद

संध्याकाळी ६.०० ते ८.०० या वेळेमध्ये स्थानिक मंडळांचे सुस्वर भजन

रात्रौ ८.३० वाजता स्थानिक कलाकारांची अदाकारी ने नटलेला *मालडीची लोकधारा* हा कार्यक्रम सादर केला जाईल .