अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितत बक्षीस वितरण संपन्न
बसवेश्वर जयंती निमित्त लिंगायत समाजाने महिलांची पलकला स्पर्धा ,फणी गेम,सर्व वयोगटातील विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते .यावेळी समाजातील जी मुलं अनेक स्तरावर उत्तम प्रगती करत आहेत जिल्हास्तर, राज्यस्तर क्रीडा स्पर्धा, कला शैक्षणिक ,अशा अनेक स्तरावर मुलांनी उत्तम यश मिळवलेले आहे अशा सर्व गुणी मुलांचा सन्मान चिन्ह देऊन अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांच्य हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी सौ कांबळी यांनी मालवणी भाषेत सर्वांना शुभेच्छा देऊन उपस्थित सर्वांनी मने जिंकली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम च्या अध्यक्षा माझी नगरसेविका सौ सुप्रिया नलावडे. लिंगायत समाजाचे अध्यक्ष प्रकाश घेवारी ,उपाध्यक्ष गजानन उचले ,सचिव सचिन टोणेमारे
खजिनदार अजित नष्टे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी ज्यांनी निमंत्रित केले त्या सौ प्रिया.सरुडकर आणि अजित नष्ठे यांचे अभिनेत्री कांबळी यांनी मनापासून आभार मानले.











