रत्नागिरी : येथील क्वालिटी स्क्रीन्सचे मालक जितेंद्र जोशी यांच्या मातोश्री आणि क्वालिटी सर्व्हिस उद्योगाच्या सर्वेसर्वा कुंदा भगवान जोशी (वय ८२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे ग्राहक आणि कर्मचारीवृंदामध्ये त्या लोकप्रिय होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.












