नाटेकर, गांधी ,कीर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ , रत्नागिरी संचलित पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला, कै.सौ. विजयालक्ष्मी (गोदूताई)श्रीकृष्ण (नाना)गांधी वाणिज्य व श्रीमान रमेशजी कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले .मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे असे कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सहाय्यक शिक्षिका सौ.मानसी चव्हाण यांनी सांगितले. मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी विद्यार्थ्यांना योगासंदर्भातील निरनिराळी प्रात्यक्षिके देण्यात आली.

क्रीडा शिक्षक श्री. मांजरेकर सर यांनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी योगासने करून घेतली. शरीरासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे असे श्री .मांजरेकर सर म्हणाले. श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी व श्रीमती शबनम तहसीलदार या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीम. जानकी घाटविलकर व उपप्राचार्य श्री रुपेश पंगेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला