सावंतवाडी शहरासह तालुक्यातील होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांची मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी :
मुंबई घाटकोपर येथे होर्डिंग्स कोसळून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरासह तालुक्यात असलेल्या होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
सावंतवाडी शहरासह तालुक्यात वर्दळीच्या ठिकाणी हायवेवर अशा प्रकारचे मोठी मोठी होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस लक्षात घेता या ठिकाणीही धोका किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा होर्डिंग्सची तपासणी करण्यात यावी, त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरात इमारतींवर बसविण्यात आलेले टॉवरच्या बाबतही सुरक्षेसाठी तपासणी व्हावी. तसेच धोकादायक असलेले होर्डिंग्स तात्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.