सिंधुदुर्गात ‘एक राखी लाडक्या देवाभाऊंसाठी’ अभियान यशस्वी, पन्नास हजार राख्या सुपूर्त : संदीप साटम यांची माहिती

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी :
‘एक राखी लाडक्या देवाभाऊंसाठी’ या अभियानांतर्गत तब्बल ५० हजार राख्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व संयोजक, सहसंयोजक, मंडळ अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

अभियानाच्या यशस्वीतेसाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा संयोजक संदीप साटम व सौ. श्वेता कोरगावकर यांनी सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले व अभिनंदन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत या अभियानाचे संयोजक संदीप साटम, श्वेता कोरगावकर भाजपा पदाधिकारी मनीष दळवी, अतुल काळसेकर, संदीप मेस्त्री, अशोक सावंत, रणजीत देसाई व जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष उपस्थित होते.