चिंचघर दस्तुरी फाटा नजीक मटका जुगार अड्ड्यावर धाड

crime jugar
खेड(प्रतिनिधी)
खेड दापोली मार्गावरील चिंचघर दस्तुरी फाटा नजीक मटका जुगार खेळणाऱ्या जुगार अड्डयावर धाड टाकून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई १७ मे रोजी सायंकाळी ५ वा च्या सुमारास करण्यात आली
रमेश अनंत पिंपरे वय – ४९ वर्षे रा. सुसेरी नं. २ ता. खेड, असे त्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे  पिंपरे हा  दैनिक वर्तमान पत्रात प्रसिध्द होणा-या शुभअंकावर लोकांकडुन पैसे स्विकारून ते स्वतः चे फायदयासाठी कल्याण नावाचा मटका जुगार  खेळ खेळवित असतांना मिळुन आला.त्याच्या कडून  १ हजार  रु रोख रक्कम व  साहीत्य मिळून आले