दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार 

शिवसेना युवासेना मालवण तालुका व युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने मालवणात गुणवंतांच्या घरी जाऊन करण्यात आला गौरव 

अमित खोत | मालवण : शिवसेना युवासेना मालवण तालुका तसेच युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने शिवसेना नेते किरण सामंत यांच्या मार्गदर्शनानुसार मालवण शहर प्रशालेतील दहावी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. कॉलेज उपयुक्त भेटवस्तू, गुलाब पुष्प-रोप देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

गुणवंत विद्यार्थी यामध्ये आर्य कुलकर्णी जय गणेश हायस्कूल

दहावी प्रथम क्रमांक 97.20 टक्के यांचा मालवण प्रतिभा रेसिडेन्सी येथे घरी जाऊन पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच सम्राट राजे भंडारी हायस्कूल मालवण

दहावी प्रथम क्रमांक 96.20 टक्के प्राईड सोसायटी मालवण येथे घरी जाऊन सम्राटचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. यांसह कैवल्य सागर मिसाळ 99.40 टक्के गुण

टोपीवाला हायस्कूल मालवण प्रथम क्रमांक याचाही

कुंभारमाठ येथे घरी जाऊन पालकांसह सत्कार करण्यात आला. तर ओम विश्वास गांवकर

जय गणेश हायस्कूल मालवण

81 टक्के रा. प्रतिभा रेसिडेन्सी या गुणवंत यांचाही घरी जाऊन पालकांसह सत्कार करण्यात आला.

 

यावेळी शिवसेना-युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवती सेना मालवण तालुका प्रमुख मधुरा तुळसकर शिवसैनिक उपस्थित होते.