खेड(प्रतिनिधी) डोळे असूनही त्यांच्यापुढे अंधार असला तरी त्यांच्या जीवनातील अंध:कार दूर करत संपूर्ण आयुष्यच प्रकाशमान करताना त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी अविरतपणे झटणाऱ्या मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेहज्योती अंध विद्यालयास कर्मयोगी दादासाहेब इदाते समरसता प्रतिष्ठानचा सेवाभावी संस्था समरसता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून स्नेहज्योती अंध विद्यालय अंध विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी झटत आहे. स्नेहज्योती अंध विद्यालयाने शैक्षणिक, सामाजिक,
सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उठावदार कामगिरीची दखल घेत सेवाभावी संस्था समरसता पुरस्कार देवून गौरवण्यात आले. शालेय समितीचेअध्यक्ष उत्तमकुमार जैन व प्राचार्या प्रतिभा सेनगुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याबद्दल स्नेहज्योती अंध विद्यालयाचे कौतुक होत आहे.









