लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील श्रीराम विद्यालय, तू.पू.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व का.रा.कोळवणकर यामाहा ट्रेनिंगस्कूल मध्ये व्यसनमुक्ती मार्गदर्शन नुकतेच पार पडले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे सचिव संतोष पडवणकर उपस्थित होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल रेडीज व शालेय समितीचे सदस्य सुरेश चव्हाण उपस्थित होते. संतोष पडवणकर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे प्रकार ,आणि व्यसनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम , मुलांनी व्यसनाकडे वळू नये एखादे व्यसन जडल्यास काय होते, त्याचे परिणाम अशा विविध मुद्द्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. धुम्रपान आणि त्यामुळे आपल्या व इतरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम हानिकारक आहेत. आज व्यसनमुक्त जीवन जगण्याची कला ही काळाची गरज आहे .त्यानी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला.
कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते. संतोष पडवणकर यांचे आभार शिक्षक बांगर व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.












