खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील नांदगाव-दळवीवाडी येथील नवशक्ती बचत फंड दळवी बंधूंच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता १२वीतील सार्थक दळवी, श्रावणी दळवी, अथर्व दळवी, साईराज दळंवी, इयत्ता १०वीतील यश दळवी, शर्वरी दळवी, मिहीर दळवी, पदवीप्राप्त विनया चव्हाण, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त मानसी दळवी, राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे श्री दळवी, श्लोक दळवी, राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त विहान दळवी, पदवीप्राप्त संभाजी दळवी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशांत दळवी, अविनाश दळवी, अमोल दळवी, अमर दळवी, प्रवीण दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.











