लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदी ला. गणेश धुरी

 

सचिवपदी ला. विश्वास ढोकळे व खजिनदारपदी ला. अमेय वीरकर

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या नियमावलीनुसार सन 2024- 2025 च्या लायन्स क्लब रत्नागिरीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावर्षीच्या अध्यक्षपदी लायन्स गणेश धुरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. सचिवपदी लायन्स विश्वास ढोकळे व लायन्स अमेय विरकर खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 

लायन गणेश धुरी हे रत्नागिरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आहेत, तर लायन विश्वास ढोकळे यांची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तर अमेय वीरकर हे ज्वेलर्स आहेत. त्याच बरोबर लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून ला. शिल्पा पानवलकर, प्रथम अध्यक्ष ला. दीप्ती फडके, द्वितीय अध्यक्ष ला. डॉ. शिवानी पानवलकर, तृतीय अध्यक्ष ला. संजय पटवर्धन, असोसिएट सेक्रेटरी ला. शरद नागवेकर, असोसिएट खजिनदार ला. सुमित ओसवाल, टेमरसाठी साक्षी धुरी, टेल ट्विस्टरला मनोज सावंत, पीआरओ ला. महेंद्र मांडवकर, गॅट चेअरमन ला. श्रेया केळकर, जीएसटी चेअरमन ओंकार फडके, जीएसटी चेअरमन दत्तप्रसाद कुलकर्णी, जीएसटी चेअरमन अ‍ॅड. शबाना वस्ता, क्लब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ला. पराग पानवलकर, चेअरमन ला. सुप्रिया बेडेकर, बुलेटीन एडिटर ला. संतोष बेडेकर, आयटी चेअरमन ला. अस्लम वस्ता, क्विस्ट चेअरमन ला. प्रवीण जैन, मार्केटिंग अँड कम्युनिकेशनपदी ला.न संकेत नवले, क्लब एक्सटेन्शन चेअरमन ला. सुनील देसाई यांची निवड करण्यात आली.

 

लायन्स क्लब रत्नागिरीच्या डायरेक्टर पदी डॉ. रमेश चव्हाण, ला. सीए हेरंब पटवर्धन, सुधीर वणजू, ला. सीए बिपीन शहा, ला. उत्तमचंद ओसवाल, ला. डॉ. भोळे, ला. प्रमोद खेडेकर, ला. यश राणे, ला. दीपक साळवी यांची निवड करण्यात आली आहे.