रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांचा आज स्वीकारणार पदभार

आता उत्सुकता पाणी, आरोग्य कुणाकडे जाणार याची

रत्नागिरी :रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे या आज सोमवारी (२९ डिसेंबर) सकाळी ११ वाजता पदभार स्वीकारणार आहेत. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्य निवडीकडे लक्ष लागणार आहे

निवडणुकीत शहरातील १६ प्रभागातून ३२ नगरसेवक निवडून आले आहेत. या नगरसेवकांतून उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. याशिवाय सर्व विषय समित्यांची स्थापना होऊन सभापतींची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे आता उपनगराध्यक्ष तसेच सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. त्यातही