लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आरगाव विविध सहकारी सेवा सोसायटीची मासिक सभा नुकतीच ज्येष्ठ संचालक चंद्रकांत (दादा) खामकर यांच्या घरी पार पडली.
या सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मुन्ना खामकर हे उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन केले. सदर सभेमध्ये सर्व कर्जदारांची कर्ज मंजुरी करण्यात आली. तसेच कर्जदारांनी शंभर टक्के कर्ज परतावा केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. सोसायटीचे सचिव महेश कदम यांनी चांगले काम केले याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला.सभेमध्ये सर्वांनी सकारात्मक चर्चा करून सोसायटीच्या प्रगतीबाबत मत मांडले..
आभार ज्येष्ठ संचालक चंद्रकांत खामकर यांनी मानले.यावेळी चेअरमन रवींद्र खामकर व्हा. चेअरमन यशवंत आमटे, जितेंद्र खामकर, संचालक केशव भालेकर, सविता खामकर ,स्वानंद कदम, रामदास खामकर, संदेश खामकर, ज्योती खामकर, शिवराम राजापकर सर्व संचालक उपस्थित होते.












