पूरे बुद्रुक शाळेला भर पावसात तडे, पालक धास्तावले

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेला च्या भिंती ना भर पावसात तडे गेले असून शाळेचे जोते देखील कोसळल्यने पालक धास्तावले असून शाळेची डागडुजी करण्याची मागणी होत आहे

खेड तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे या पार्श्वभूमीवर जुनाट असलेली जि प शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून पडत असलेल्या पावसाने त्यात आणखी भर पडल्याने जोते कोसळून गेले आहे तर भिंती यांना तडे जाऊन विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे

दरम्यान शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी वर्गाचे नुकसान होऊ नये या करिता त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्यात आली असली तरी या शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी आता पालक व ग्रामस्थानी लावून धरली आहे नुकताच शिरवली शाळेचे प्रकरण ताजे असताना पुरे बुद्रुक शाळेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासन या कडे काय लक्ष देते या कडेच पालक व ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत