संरक्षक भिंतीसह अंगणाचा भाग कोसळला ; घराला धोका
चौके -प्रतिनिधी :-गेले काही दिवस सतत कोसळत असलेल्या पावसाचा फटका काल मंगळवारी रात्री काळसे गोसावीवाडीला बसला. अतिवृष्टीमुळे मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी रात्रौ १०:३० वाजता गोसावीवाडीतील श्री. सिताराम भगवान गोसावी यांच्या घरासमोरील दगडी संरक्षक भिंत कोसळली.सदर भिंत ही समोरील जाण्यायेण्याच्या वाटेवर कोसळल्याने वाट बंद झाली होती.
यासोबतच घरासमोरील अंगणाचा काही भागही कोसळून सिताराम गोसावी यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. या पडझडीमुळे श्री. सिताराम गोसावी यांचे सुमारे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या दुर्घटनेची माहिती काळसे तलाठी सौ. निलम सावंत,ग्रामसेवक पी.आर.निकम, पोलीस पाटील विनायक प्रभु यांना देण्यात आली आहे.











