प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांच्या हस्ते झाले SC स्क्रुटीनी सेंटर चे उदघाटन करण्यात आले.
कणकवली मध्ये ‘ पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन ’ कक्षाद्वारे अभियांत्रिकी प्रवेशासंबंधी योग्य व अचूक मार्गदर्शन मिळवू शकता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती व कार्यक्षमता असते परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय होण्याची शक्यता असते, या गोष्टीचा विचार करून ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी या मार्गदर्शन कक्षाची स्थापना केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष (पदवी) अभियांत्रिकी कोर्सेसच्या प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ही वाटचाल केली आहे.
बारावी उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कॅबिनेट मंत्री आदरणीय नारायणराव राणे साहेबांनी १९९९ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत अथवा प्रशासकीय क्षेत्रात कशी निवड होईल व उत्तम करिअर कसं घडेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवलीमध्ये होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी तसेच शैक्षणिक शुल्क, शासनाच्या विविध स्कॉलरशीप्स, विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृह सुविधा, कमवा व शिका योजना आदींबाबत चर्चा व मार्गदर्शन होण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांना अचूक माहिती मिळावी व कोणत्याही विभागातून उत्तम करिअर करता यावे यासाठी या मार्गदर्शन केंद्रात उच्चशिक्षित प्राध्यापक वर्गाची टीम सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५: ०० वाजेपर्यंत सज्ज असणार आहे. यामुळे एकाच छताखाली सर्व अचूक माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांची आवड / क्षमता, पालकांची निवड आणि प्राध्यापकांशी असणारा समन्वय / संपर्क या बाबी या प्रक्रियेत अत्यंत महत्वाच्या आहेत. अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, शैक्षणिक पात्रता, प्रवेश घेताना तसेच महाविद्यालयांची निवड करताना विद्यार्थ्यांनी करिअरचा विचार करून नेमक्या कोणत्या महत्वाच्या बाबी पहाव्यात ? कॅप राउंडस्, कॅम्पस प्लेसमेंट, ब्रँच निवड, मागील वर्षाचे विविध विभागांचे कट ऑफ मार्क्स या व इतर गोष्टींबाबत विद्यार्थी व पालक यांना योग्य व खात्रीशीर मार्गदर्शन मिळणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र शासन कडून प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार (तारखा बदलू शकतात) :
प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या साठी ऑनलाईन नोंदणी आणि दस्तऐवज पडताळणीची सुविधा, CAP जागांव्यतिरिक्त इतर जागांवर प्रवेशासाठी अर्जाची पुष्टी करणे, पडताळणी किंवा भौतिक छाननी इत्यादि सर्व प्रकारच्या प्रक्रिया ; केंद्राद्वारे ऑनलाइन २४/०७/२०२४ संध्याकाळी ०५ : ०० पर्यंत सुरू राहील. (तारखा बदलू शकतात), या तारखे नंतर नोंदणीकृत अर्ज केवळ Non-CAP जागांसाठी विचारात घेतले जातील.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी असल्यास अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. सुयोग सावंत (९४२०४५५४८८) , श्री. विशाल आमडोसकर (९४२३३०४२२७) व श्री. अनाजी सावंत (९४२२६३३८२१) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर व प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे यांनी केले आहे.










