Tatkal Booking Time Changed: रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंग वेळेत बदल होणार?

Tatkal ticket timing changed: रेल्वेच्या तात्काळ आरक्षण वेळेत बदल झाला असल्याची माहिती सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित viral होत आहे. या माहिती प्रमाणे एसी श्रेणीसाठी (AC Classes) तात्काळ आरक्षणासाठी सध्याची वेळ जी सकाळी, १० वाजता आहे ती सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. तर नॉन-एसी क्लास म्हणजे स्लीपर, सेकंड सीटिंग श्रेणीच्या आरक्षणाची सध्याची वेळ जी सकाळी ११ वाजताची आहे ती बदलून दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. या माहितीप्रमाणे येत्या दिनांक १५ एप्रिल पासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे.
मात्र समाज माध्यमावर व्हायरल होत असलेला हा संदेश खोटा असल्याची माहिती समोर येत आहे. Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने तात्काळ आरक्षणात असा कोणताही बदल करण्यात येणार नसून हा संदेश फेक असल्याचे जाहीर केले आहे.  “एक्स”  वरील अधिकृत खात्यावर या आशयाची पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे.