अतिवृष्टीमुळे देवगड तालुक्यातील सुमारे दीड लाखाचे नुकसान ; पावसाने ओलांडला दोन हजाराचा टप्पा

संरक्षक भिंत कोसळल्याने चाफेड मध्ये मोठे नुकसान ; देवगडात तालुक्यात ८३ मिमी पाऊस

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी पहाटे अतिवृष्टीसह झालेल्या वादळी वाऱ्यात तालुक्यात ठिकठिकाणी किरकोळ पडझड होऊन सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात ८३ मिमी पावसाची नोंद असून आतापर्यंत (२०८९) दोन हजाराचा टप्पा पावसाने पार केला आहे.

देवगड त तालुक्यात गुरुवारी सायंकाळी व रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड होऊन सुमारे १ लाख ५८ हजार १०० रुपयाचे नुकसान झाले आहे.यामध्ये दाभोळे गणेश नगर येथील बाळकृष्ण आत्माराम राऊत यांच्या मांगराचे पत्रे उडून सुमारे २१ हजार,शुक्रवारी सकाळी सात वाजता चाफेड येथील प्रवीण शिवाजी राणे यांच्या कंपाउंडची संरक्षक भिंत कोसळून सुमारे १ लाख, तर (गिर्ये) बांदेगाव येथील शंकर हरी पोसम यांच्या घराचे पत्रे फुटून सुमारे २ हजार ६०० तर मिठबाव देऊळवाडी येथील पुंडलिक आचरेकर याचा गोठा कोसळल्याने सुमारे ३४,हजार ५०० चे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर अजून सुरूच असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .