बांदा सटमटवाडीत ५ फूट मगर पकडली

 

 

बांदा l प्रवीण परब :   बांदा खालची सटवाडी येथे गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सुमारे ५ फूट मगर रस्त्यावर असल्याचे निदर्शनास आले. यावेळी वनविभाग याची कल्पना देताच वनविभाग यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या सहाय्याने मगरीला पकडले व येथील जवळच्या नदीत सोडून जीवदान दिले.

 

याबाबत अधिक माहिति अशी की, मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे येथील नदी नाल्यांना पाण्याचे प्रमाण वाढले होते. पाणी वाधले असल्याने ही मगर रस्त्यावर असल्याचे निदर्शनास आले. मगर रात्यावर असल्याची बातमी गावांत पसरताच मगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. भली मोठी मगर दोन तास रस्त्याच्या बाजूलाच आसरा घेऊन राहिली. याबाबतची कल्पना येथील बांदा वनविभागला कळवण्यात आली. त्यानंतर वनवीभागाचे अधिकारी कर्मचारी घटना स्थळी आले. त्यांतर दोरीच्या सहाय्याने व ग्रामस्थांच्या मदतीने त्या मगरीला पकडण्यात यश आले.

 

यावेळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन शिरसागर, वनपाल प्रमोद सावंत, दत्तात्रय शिंदे, संग्राम पाटील, ब्रम्हकुमार भोजणे, बांदा पोलीस संजय हुंबे, ग्रामस्थ दाजी परब, दशरथ परब, आपा परब, लवू परब, अक्षय परब, समीर शिरोडकर, तुषार परब, सहदेव परब, राजू परब आदी ग्रामस्त उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्याने त्यामगरिला पकडून तिला नदीत सोडून जीवदान दिले.