मंडणगड l प्रतिनिधी – मंडणगड तालुका तालुका विकास मंडळ( F -1428 ) मुंबई संचलित, पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच आपले विद्यार्थी उतरवून प्रस्थापितांना धक्का देत विजयाला गवसणी घातली आहे. यामध्ये 14 वर्षे वयोगट मुलींच्या स्पर्धेत इ.8 वी मधील विद्यार्थिनी कुमारी आर्या सतीश सवणसकर हिने 5 वा क्रमांक पटकावला तर त्याच गटात इ.8 वी मधील कुमारी पायल दत्तात्रय घुगे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सदर दोन्हीही विद्यार्थिनी जिल्हा स्तरासाठी पात्र झाल्या आहेत.
दोन्हीही विद्यार्थिनींना प्रशालेचे क्रीडा विभाग सांभाळणारे श्री.इंगळे आर. व्ही.यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेच्या या यशाबद्दल संस्था, प्रशालेचे प्र.मुख्याध्यापक , शालेय समिती अध्यक्ष व सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती, पालक, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , माजी विद्यार्थी यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











