Ophthalmology examination of 150 people completed in Infigo Eyecare Hospital’s Ophthalmology Camp
मंडणगड | प्रतिनिधी :इन्फिगो आयकेअर हॉस्पीटल खेड यांच्यावतीने 24 एप्रिल 2023 रोजी मंडणगड नगरपंचायत सभागृहात मोतीबिंदू तपासणी व नेत्रचिकीत्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील 150 हुन अधिक नेत्र रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला यातील 21 जणांना मोतीबिंदुची बाधा झालेली असल्याचे त्यांना पुढील उपचाराकरिता संदर्भीत करण्यात आले. नगरपंचायतीने सहकार्याने आयोजीत हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता रेटीना सर्जन डॉ. प्रसाद कामत मुंबई, खेड सेंटरचे डॉ. सुशांत पांचाळ, ऑपटम आकाश कांबळे, ऑपटम निकिता कोकाटे, काऊंसलर राजेश्री कांबळे, सेसोनिस्ट अश्विता लाले, ओपीडी असिस्टंट दामिनी वालकर, मार्केटीग पर्सन अनिल यादव, डायव्हर योगेश सकपाळ, ऑप्टीकल प्रणाली इंदुलकर यांनी मेहनत घेतली. मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद डवले, नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे सर्व नगरसेवक व कर्मचाऱ्यांनीही उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.











