लोटेतील ४५ वर्षीय प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील लोटे-तलारीवाडी येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या ४५ वर्षीय प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. सुहास जनार्दन सातपुते असे मृत प्रौढाचे नाव आहे. तो लक्ष्मी बावदाने यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्यास होता.
रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटीचे मालक महेश पालांडे यांनी त्याला घरी सोडले असता त्यावेळेस तो दारूच्या नशेत होता. त्याला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने लक्ष्मी बावदाने यांनी त्यांच्या जावयास बोलावून रुग्णवाहिकेने वैद्यकीय उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठवले. याचदरम्यान, सायंकाळच्या सुमारास प्रौढाचा मृत्यू झाला. येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.