तहसीलदार वर्षा झालटे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण 

 

 

भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन समारंभ मालवण तहसीलदार कार्यालय येथे उत्साहात साजरा

अमित खोत | मालवण :भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन समारंभ मालवण तहसीलदार कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार वर्षा झालटे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे यांनी सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांसह पोलीस, एनसीसी विभाग, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्था, नागरिक उपस्थित होते.

 

फायरिंग स्पर्धा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या हर्षदा पवार यांचा विशेष सत्कार यावेळी तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला. हर्षदा हिचे आई वडील यावेळी उपस्थित होते.

 

अन्य काही सत्कार यावेळी करण्यात आले. तर यावेळी लायन्स क्लबच्या वतीने जिलेबी वितरण करण्यात आले.