जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुलींच्या गटात ‘मदर क्वीन’ला विजेतेपद

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात मदर क्वीन ने विजेतेपद तर मिलाग्रिस हायस्कूलच्या १४ वर्षा खालील मुली व १७ वर्षा खालील मुलगे यांनी उपविजेतेपद,१७ वर्षा खालील मुलींनी तृतीय क्रमांक पटकावला.

सिंधुदुर्गनगरी येथे १३ व १४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बॅडमिंटन जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सावंतवाडी च्या एनआयएस चे बॅडमिंटन कोच श्री सुमुख चव्हाण यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत ३० हून अधिक मुलांनी विविध शाळेतून सहभाग घेतला. तसेच या स्पर्धेत पंच म्हणून सुमुख चव्हाण यांनी काम पाहिले.
मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या मुलींनी १४ वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावले.त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला विभागीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करतील. तसेच १४ वर्षाखालील मुली व १७ वर्षाखालील मुले- मिलाग्रीस इंग्लिश हायस्कूलने उपविजेतेपद पटकावले आणि १७ वर्षाखालील मुलींनी तृतीय स्थान पटकावले.
या वैयक्तिक निवड चाचणीत कुमारी कृतिका पालव, कु. यश दोड्डमणी, कु. अद्वय देशपांडे, कु. आयुष कंटक यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. वरील सर्व संघ व खेळाडूंना श्री पंचम खेमराज महाविद्यालय हॉल येथे कोच सुमुख चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्याच सोबत सर्व सहभागी खेळाडूंनी आपल्यापरीने उत्कृष्ट खेळ करत सामने रंगत आणली. सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक सुमुख चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी मिलाग्रिस हायस्कूलच्या क्रिडा शिक्षक शेराॅन अल्फान्सो उपस्थित होत्या.