खेड (प्रतिनिधी) नैसर्गिक आपत्ती,शासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रसिद्धी, निवडणूक विषयक कामकाज व इतर कामकाजात आपली कर्तव्य व जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली असून अतिशय उत्तम कामकाज केलेले असल्याने ठाणे जिल्हा माहिती कार्यालयचे लिपिक संदीप यशवंत गोवळकर (खेड हेदली)
यांना ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या कडून उत्कृष्ट कर्मचारी असल्याचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
देशांच्या ७८ व्या स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा व जिल्हयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणगौरव सोहळाचे आयोजन ठाणे नियोजन भवन येथे करण्यात आले होते.यावेळी श्री गोवळकर यांना गौरविण्यात आले.
यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन घुगे, ठाणे सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, ठाणे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उप जिल्हाधिकारी दीपक चव्हाणआदि मान्यवर उपस्थित होते.
संदिप गोवळकर हे सामाजिक कार्यकर्ते असून संविधान प्रेमी म्हणून त्यांनी ओळख आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती, पर्यावरण संरक्षण, असे समाज उपयोगी कामामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.











