दापोली | प्रतिनिधी : महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील सुमारे ४५० महिला या साहित्य संमेलनात सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरी समूहातील सोनाली सावंत हिने ग्रंथ पालखी डोक्यावर घेऊन नाचवली व कोकण संस्कृती सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तर कोकणातील गुहागर सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या मीनल ओक हिने कवितेचे उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवल अशाप्रकारे रत्नागिरी येथील महिलांनी या साहित्य संमेलना वरती आपला ठसा उमटवला.एका अप्रतिम साहित्य संमेलनाची साक्षीदार होण्याचे भाग्य आम्ही सिद्ध लेखिका आणि ठाणेकर यांच्या मुळे लाभले अशी प्रतिक्रिया ठाणे येथील साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या रत्नागिरी येथील महिलांनी व्यक्त केली आहे.
या साहित्य संमेलनात नृत्याद्वारे शारदावंदन आणि महाराष्ट्र राज्य गीत सुंदररित्या सादर करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिका पद्माताईंनी प्रास्ताविक करून सगळ्यांचे स्वागत केले.दोन वर्षाचा आम्ही सिद्ध लेखिकांचा साहित्य प्रवास सहजसुंदर शब्दांत अभिव्यक्त केला. यानंतर उषाताई चांदूरकर,माधवी नाईक , वीणाताई गवाणकर आणि शुभांगीताई भडभडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.यावेळी ‘सिद्ध सखी’ या विशेषांकाचे आणि स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर ठाण्यासह इतर जिल्ह्यातील आठ साहित्यिक सख्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले.अत्यंत उत्साहपूर्ण व प्रसन्न वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला
त्यानंतर दोन मंगलमय साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पाहुण्यांच्या अप्रतिम मुलाखती झाल्या यावेळी मंगलाताई गोडबोले आणि मंगलाताई खाडिलकर यांनी आपला जीवनप्रवास उलगडत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
भोजनात आमरस पुरी हा कोकणी थाटाचा बेत ठेवण्यात आला होता या भोजनाचा सगळ्यांनी मनापासून आस्वाद घेतला.सिद्ध लेखिका संस्थेच्या सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधित्व करणा-या कवयित्रींच्या कविसंमेलनाचा आपलं साहित्य कविता सादर केल्या. यावेळी व्यासपीठावरती कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्याच्या ज्योत्स्ना चांदगुडे, प्रमुख पाहुण्या रत्नागिरीच्या सुनेत्रा जोशी आणि नागपूरच्या कविता कठाणे उपस्थित होत्या. ‘ती ‘ या विषयावरील वैविध्यपूर्ण कविता सादर झाल्या त्याचवेळी मार्च महिन्यात याच विषयावर झालेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी कोकण विभागाने पार पाडली. यशस्वी झालेल्या कवयित्रींना पारितोषिके देण्यात आली. यात रत्नागिरीच्या मीनल ओक हिला तृतीय क्रमांक मिळाला तसेच ऋतुजा कुळकर्णी, शर्वरी जोशी, अनुराधा दीक्षित, रेखा जेगरकल,यांनी निमंत्रित कवयित्री म्हणून कविता सादर केल्या. प्रमुख पाहुणे मा. सुनेत्रा जोशी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून बहारदार गझल सादर केली.
कविसंमेलनानंतरचा ‘ती बोलू लागली” हा हा विशेष परिसंवाद झाला त्यात वकील प्रार्थना सदावर्ते, सीमंतिनी नूलकर, सामाजिक कार्यकर्त्या नयना सहस्रबुद्धे यांनी आपले ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त केले. त्यामुळे हा परिसरात उत्तरोत्तर रंगत गेला याच कार्यक्रमात मा. शुभांगी भडभडे यांना साहित्य तपस्विनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी मधल्या16 लेखिका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. ज्यांना आतापर्यंत टीव्ही मध्ये पाहिले , पेपर मधून वाचले त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा आनंद अविस्मणीय संधी सगळ्यांनाच मिळाली.
ठाण्यातील सख्यांमुळे हे उत्कृष्ट साहित्य संमेलन पार पडलं याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ठाणेकर सख्या , सिद्ध लेखिकांची कार्यकारिणी, विश्वस्त सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ साहित्यिका पद्माताई हुशिंग यांचे उपस्थित महिलांनी आभार मानले












