खेड | प्रतिनिधी : यंदा १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू
होणार आहे. कोकण मार्गावर १४ सप्टेंबरपासून
सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण १७
मेपासून खुले होणार असल्याने गणेशभक्त
कमालीचे. सुखावले आहेत. नियमित रेल्वे
गाड्यांसह ‘गणपती स्पेशल’ गाड्यांची आरक्षित
तिकिटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट
• खिडक्यांवर चढाओढ सुरू होणार आहे.
गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात
दाखल डेरेदाखल होत असतात. कोकणात
जाणाऱ्या सर्व गाड्यांचे बुकींगही २ ते ३
मिनिटातच फुल्ल होत असल्याने आरक्षित
तिकिटांसाठी तासन्तास तिकीट खिडक्यांवर
ताटकळत उभे राहूनही पदरी निराशाच पडते.
यंदा १९ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार
आहे. गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावरून
धावणाऱ्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त सोडण्यात
येणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित
तिकिटे मिळवण्यासाठी ऑनलाईनप्रमाणेच तिकीट
खिडक्यांवरही गर्दी उसळणार आहे.गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाड्या १४.ते
२८ सप्टेंबरपर्यंत गणपती स्पेशल गाड्या धावणार
आहेत.
१७ मे रोजी १४ सप्टेंबरच्या प्रवासाचे
आरक्षण, १८ रोजी १५ सप्टेंबर, १९ रोजी १६
सप्टेंबर, २० रोजी १७ सप्टेंबर, २१ रोजी १८
सप्टेंबर, २२ रोजी १९ सप्टेंबर, २३ रोजी २०
सप्टेंबर, २४ रोजी २१ सप्टेंबर, २५ रोजी २२
सप्टेंबर, २६ रोजी २३ सप्टेंबर, २७ रोजी २४
सप्टेंबर, २८, रोजी २५ सप्टेंबर, २९ रोजी २६
सप्टेंबर, ३० रोजी २७ सप्टेंबर, तर ३१ रोजी
२८ सप्टेंबराया प्रवासाचे आरक्षण करता येणार
आहे. परतीच्या प्रवासासाठी ४ जूनला २ ऑक्टोबरचे बुकिंग होणार आहे. रेल्वे प्रशासनाने आरक्षण व प्रवासाच्या तारखा जाहीर केल्यामुळे चाकरमान्यांचा
मनस्तापही कमी होण्यास मदत होणार आहे. या
कालावधीत कोकण मार्गावर किती गणपती स्पेशल
गाड्या सोडण्यात येतील, हे रेल्वे प्रशासनाने
अद्याप जाहीर केलेले नाही. यामुळे चाकरमान्यांच्या
नजरा गणपती स्पेशल गाड्यांकडे लागल्या आहेत.









