भरणे मध्ये मटका जुगार अड्डयावर धाड, दोघांवर गुन्हा

 

खेड (प्रतिनिधी) शहरासह भरणे परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या मटका जुगार अड्डड्यांवर धाडीटाकण्याचे सत्र सुरूच आहे. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळच्या
सुमारास पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २,५५० रूपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

संतोष यल्लाप्पा कानापुरे (भरणे- समर्थनगर), अशोक विक्रम यादव (भरणे – बौद्धवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेजण एका दैनिकाच्या शुभअंकावर मटका जुगाराचा खेळ खेळवत असताना दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.