लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल
लांजा( प्रतिनिधी) लांजा येथे मेहंदीची ऑर्डर आहे असे सांगून घराबाहेर पडलेली रिंगणे कोंडगाव येथील
२२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची फिर्याद वडीलांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद जहीर अब्बास मापारी (वय ४१ राहणार रिंगणे कोंडगाव) यांनी लांजा पोलिस ठाण्यात केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी सिफा जहीर मापारी (वय २२) ही मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी झर्ये या एसटी बसने आपणाला लांजा येथे मेहंदीची ऑर्डर आहे असे घरात सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती सायंकाळी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र नातेवाईक व अनेक ठिकाणी शोधाशोध केली .मात्र तिचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने वडील जहीर मापारी यांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद आज बुधवारी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे .
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जान्हवी मांजरे या करत आहेत.












