सिंधुदुर्ग –
अपघाताने झालेले सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मुळे भारतीय जनता पक्षाला व या जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांना एक कर्तुत्ववान नेतृत्व मिळाले! माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या साथीमुळे मुंबई सह कोकण विभागात भाजपा बहरत गेला. साद्या नगरसेवक पदावरून तीन वेळा आमदार व मंत्री झालेले हे नेतृत्व सर्वसामान्य जनतेसाठी उभे राहिले. सत्तेचा नाही माज, मंत्रीपदाचा नाही गर्व असे हे नेतृत्व या जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यरत झाले. एवढ्या मोठ्या मंत्रिपदाचा वापर या जिल्ह्यासाठी झाला! या सत्तेचा, मंत्रीपदाचा या नेतृत्वाचा वापर जिल्ह्यासाठी झाला हे या जिल्ह्यात झालेल्या विकासातून दिसले. आदरणीय रवींद्र चव्हाण यांचे हे कष्टाळू नेतृत्व आणखी बहरत जावो म्हणून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा!

या जिल्ह्यात अनेक नेतृत्व निर्माण झाली. अन्य काही राजकीय पक्षाने पालकमंत्री पदी पर जिल्ह्यातील नेतृत्वांना संधी दिली. सेना-भाजप युतीच्या काळात जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वाला पालकमंत्री पदी संधी दिली. यावेळीही जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या रवींद्र चव्हाण यांना संधी मिळाली. भाजप नेते नारायण राणे यांच्या पाठोपाठ त्यांच्या खांद्याला खांदा लावून रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न व जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले. मागील सत्तांमध्ये मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न रखडत पडला होता. अपूर्ण महामार्गामुळे टीकाकार जरी टीका करत असले तरी या नेतृत्वाने हा प्रश्न अंगावर घेऊन लवकरात लवकर कसा मार्गी लावता येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले.
मालवण तारकर्ली येथे झालेला नौसेना दिनाचा ऐतिहासिक कार्यक्रम व पर्यटन स्थळ म्हणून राजकोट किल्ला विकसित करून जगाच्या नकाशावर झळकवला . दुर्दैवाने शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना मनाला दुःख देणारी होती. विरोधकांनी राजकीय भांडवल करून जरी आरोप केले असले तरी हा कार्यक्रम करणे साडेतीनशे वर्षाची ऐतिहासिक घटना जागृत करणे ही ही एक दूरदृष्टी होती. छत्रपतींच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त या जिल्ह्यात नौसेना दिनाचा कार्यक्रम त्यात पंतप्रधानांची उपस्थिती व शिवरायांचे आरमार केंद्र असलेल्या दुर्लक्षित राजकोट किल्ला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी केलेले विशेष प्रयत्न व त्यासाठी राज्य शासनाकडून या जिल्ह्यासाठी मिळालेल्या भरीव निधी हे सर्वच अभिमानास्पद आहे!
सिंधुदुर्ग जिल्हा विकासामध्ये पुढे यावा, जनतेचे दरदोई उत्पन्न वाढावे म्हणून पर्यटन विकासाला चालना देण्याचे काम या काळात झाले. जिल्हा नियोजन चा विकास निधी जास्तीत जास्त मिळावा म्हणून नारायण राणे यांची परंपरा या नेतृत्वानेही कायम ठेवली. पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री या दोन्ही विभागांचा समन्वय अन्य विभागांशी साधून अनेक लोकोपयोगी कामे या जिल्ह्यात दिसू लागली. रस्ते साकव, विद्युतीकरण, सिंचन पाणीपुरवठा या कामांना गती तर मिळालीच पण त्यापेक्षा पर्यटन विकासाला पूरक ठरणारी अनेक कामे झाली. यात्रा स्थळ व धार्मिक ठिकाणे यांना विशेष निधी दिला गेला, माणगाव येथील दत्त मंदिर, आंगणेवाडी कुणकेश्वर या मोठ्या देवस्थानांबरोबरच जिल्ह्यातील छोट्या छोट्या देवस्थानाचा समावेश करून सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला.
पाच रेल्वे स्थानकांचे झाले सौंदर्यीकरण या नेतृत्वाच्या कल्पकतेमुळेच झाले. तसे पहिले तर कोकण रेल्वे या जिल्ह्यातील पर्यटन विकासामधून दुर्लक्षित राहिली होती. रेल्वे स्थानकाकडे जाणारी रस्ते व रेल्वे स्थानकावरील सुविधा यामुळे त्रस्त नागरिकांना अनेक वर्षे त्रास सहन करावा लागला. रेल्वे स्थानकावर ला जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व रेल्वे स्थानकावरील आवश्यक सुविधा निर्माण झाल्यामुळे अनेक वर्षांचा हा प्रश्न कायमचा मिटला. जिल्ह्यातील शासकीय विश्राम गृहे व त्यांचा अधिक विकास याच नेतृत्वामुळे शक्य झाला. जिल्ह्याच्या पर्यटन विकासामधील ही गती झटकन दिसली. सिंधुरत्न सारखी एक चांगली योजना भाजप युती सरकारने आणली व त्याचे सकारात्मक परिणाम या जिल्ह्यात दिसू लागले. पर्यटन विकासाची ही सर्व अंगे सरकारी विभागाबरोबरच खाजगी विकासाला मदत करून विकसित करण्याचा चांगला प्रयत्न सुरू झाला . विरोधकांची जरी टीका सुरू असली तरी त्यांच्या सत्ता काळात एवढा मोठा विकास निधी एवढी मोठी विकास कामे दिसलेली नाही. त्यांच्या सत्ता काळात कोकण व कोकणातील जिल्हे दुर्लक्षित राहिले. पश्चिम महाराष्ट्र व अन्य जिल्ह्यांकडे त्या काळात वळविला गेला. या जिल्ह्यात भाजपला नेते पद मिळालं व रवींद्र चव्हाण यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे विकासाच्या सर्व क्षेत्रांकडे लक्ष दिले गेले.
जनतेचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत म्हणून यास नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष दिले व प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघ निहाय सलग तीन दिवस स्वतः उपस्थित राlहून घेतलेला जनता दरबार सर्वसामान्य जनतेसाठी उपयोगी ठरला! प्रशासकीय पातळीवर रेंगाळलेले जनतेचे अनेक प्रश्न यातून सोडविले गेले. लोकशाहीचा हा दरबार अनेक प्रश्न सुटल्यामुळे जनतेकडून दात देऊन गेला रवींद्र चव्हाण या कल्पक नेतृत्वामुळे शक्य झाले. नेतृत्वा मागे फिरणारे कार्यकर्ते हे यापूर्वीचे राजकीय समीकरण आता बदलले गेले असून सर्वसामान्य जनतेच्या मागे फिरणारे नेतृत्व आता दिसू लागले आहे.
मुंबई डोंबिवली येथे आपली राजकीय कारकीर्द नगरसेवक या पदापासून सुरू करणारे रवींद्र चव्हाण हे गेले तीन वेळा आमदार झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे त्यांना या मंत्रिपदी संधी मिळाली. भारतीय जनता पक्षाचे तळागाळापर्यंत नागरिकांना सेवा पोचविण्याचे धोरण या नेतृत्वाने अंगीकारले. व त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा हा प्रवास अल्पावधीत बहरत गेला. सर्वसामान्य जनतेसाठी भाजप सरकारने अनेक योजना हाती घेतल्या. केंद्र सरकार त्यानंतर राज्य सरकार या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना सुरू झाल्या. महिलांसाठी, युवक युवतींच्या रोजगारासाठी रोजगारासाठी नोकरीच्या संधीसाठी योजना दूत सारख्या योजना व त्याची प्रभावी अंमलबजावणी यासाठी या नेतृत्वाने लक्ष दिले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यानाही यात लक्ष घालावे लागले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही रवींद्र चव्हाण यांना पाठबळ दिले व केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत लाभार्थी नागरिकांपर्यंत पोहोचल्या गेल्या. पूर्वीच्या सत्ता काळात ज्याची ओळख त्याचे काम हे समीकरण भाजपच्या सत्तेत बदलले गेले व या नेतृत्वाने ते कटाक्षाने पाळले. व त्यामुळे या जिल्ह्यात अनेक योजना यशस्वी ठरल्या.
भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ताकत निवडणुकीतील मतदानानंतर दिसली. भाजपला हा मतदारसंघ हवा. या मतदारसंघात उभा राहिलेला कोणताही उमेदवार कमळ निशाणीवर निवडणूक लढवेल यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पक्षश्रेष्ठीं कडील आग्रह कामी आला. माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांचे नाव पुढे आले व त्यामुळे विजयाचा मार्ग अत्यंत सोपा झाला. नारायण राणे यांच्यावरील मतदारांनी दाखविलेले प्रेम व भाजपने केलेले काम मतदारांनी दिलेल्या विजयी कौलातून दिसले. जिल्ह्यातील भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता व या कार्यकर्त्यांना मिळालेले नेतृत्वाचे पाठबळ यामुळे जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात मतदारानी चांगला प्रतिसाद दिल्याचे लोकसभा निवडणुकीत चित्र दिसले. खरंतर केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध चांगल्या योजना राबविल्या व या सर्व योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने सुरू केली. या सत्ता काळात सर्वसामान्य गरीब जनता केंद्रबिंदू ठेवून सरकारने अनेक चांगला योजना हाती घेतल्या. काँग्रेस राजवटीतील सत्ता काळ व भाजप राजवटीतील सत्ता काळ याची तुलना जनतेने केल्यास सर्वसामान्य जनता त्याचे उत्तर निश्चितच देईल. महिलांसाठी नुकतीच शासनाने हाती घेतलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण, वृद्धांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, शिक्षित उमेदवारांच्या रोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योजना दूत योजना, गरीब जनतेसाठी उज्वला गॅस योजना, विविध घरकुल योजना, आरोग्य सुविधांसाठी आयुष्यमान भारत योजना अशा विविध योजना सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू ठेवून सरकारने राबविल्या. त्याची प्रभावी अंमलबजावणी या जिल्ह्यात सुरू राहिली ते जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबाराला जे यश मिळाले त्याचे श्रेय पालकमंत्र्यांकडे जाते. तीनही विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न प्रशासनासमोर आणले गेले व त्याची सोडवणूक झाली. अधिकारा नाही त्याची तात्काळ दखल घ्यावी लागली. मागील जनता दरबाराप्रमाणेच या महिन्याच्या अखेरीस पुन्हा जनता दरबार घेण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे जनतेची कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी सर्व सरकारी यंत्रणा सतर्क झाले आहेत. मागील जनता दरबारात आलेले प्रश्न व त्याचा पाठपुरावा पुढील जनता दरबारात येणारे नव्याने प्रश्न याचाही आढावा होणार असल्यामुळे सरकारी यंत्रणा या प्रश्नांचा पाठपुरावा करताना व त्याची सोडवणूक करताना दिसत आहे. खरे तर या नेतृत्वामुळे सरकारी यंत्रणा जागी झाली आहे असेच आता म्हणावे लागले आहे.
जिल्ह्यातील विविध विकास कामाबरोबरच या जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उभी केली आहे. स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग त्याच्यासाठी ग्रंथालय सुविधा याबाबतही त्यांनी लक्ष दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना द्यावी म्हणून अनेक कामे पर्यटन स्थळ ठिकाणचे अनेक रस्ते अग्रक्रमाने हाती घेतले आहेत. केसरी येथील मरीन प्रकल्प स्वखर्चातून उभा करून त्यांनी पर्यटकांसाठी एक नवे दालन उभे करून दिले आहे. सागर किनारपट्टी गड किल्ले या ठिकाणच्या पर्यटकांना आंबोली जवळ येत असलेल्या केसरी येथील मासे पशुपक्षी असलेले एक दालन खुले झाले आहे. असा विविधांगी विकास या नेतृत्वामुळे शक्य झाला आहे.
सिंधुदुर्गातील भारतीय जनता पक्षाचे चांगले संघटन या काळात झाले असून, भाजप नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सचिव भाजप युवा नेते निलेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार, राजन तेली, ऍड अजित गोगटे आधी सर्वांशी चांगला समन्वय ठेवून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे मजबूत संघटन उभे केले आहे. तीनही विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना चांगली ताकद दिली असून संघटनात्मक बांधणी उभी केली आहे. केंद्रीय नेते नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या जिल्ह्यातील भाजप संघटन व या संघटनेचा प्रवास मजबूत केला असून या संघटनेचा फायदा सर्वसामान्य जनतेसाठी व लोकोपयोगी कामासाठी करून दिला आहे! आमचे सर्वांचे मार्गदर्शक व भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हावासीय भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने लाख लाख प्रणाम!












