देवगड फिरण्यासाठी आलेल्या युवकांचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, दोघेजण निघाले पोलीस

काढली कॉलेज युवतीची छेड ; नागरिकांकडून चोप

देवगड ः प्रतिनिधी

मौजमजेसाठी देवगडमध्ये आलेल्या नांदडेमधील युवकांनी रस्ता विचारण्याचा बहाण्याने कॉलेजमधून घरी जाणार्‍या युवतीची छेडछाड केली मात्र ती अंगलट आल्यावर बाजारपेठेतील नागरिकांकडून त्यांची यथेच्छ धुलाई करून त्यांची वरात देवगड पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आली यातील दोन युवक तावडीत सापडले मात्र चौघेजण पसार झाले.ही घटना मंगळवारी सांकाळी पावणेसहा वा.सुमारास देवगड बाजारपेठ मार्गावर घडली.पोलिस स्टेशनमध्ये आणलेल्या दोन युवकांनी पोलिस स्टेशनमध्येही धिंगाणा घातला.त्यांना विचारणा करणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍यांवरच त्यांनी हात उचलला त्यावेळी पोलिसांनीही उत्तरादाखल त्यांचा चांगला चोप काढला.या घटनेतील तिसरा युवक पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला व त्यांनी वसई वाहतुक शाखेत दोघेजण कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना सांगताच पोलिसांच्या भुवया उंचावल्या.या घटनेत पोलिस दलातील दोघेजण असल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे.

भर बाजारपेठेत एका युवतीची छेडछाड करणार्‍या युवकांमध्ये पोलिस कर्मचारी असल्याचे समोर आल्याने नागरिकांनी पोलिसांनाही चांगलेच फैलावर घेतले असून देवगड पोलिस याबाबत का कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहीले आहे.दरम्यान यातील उर्वरीत तिघांनाही सांयकाळी उशिरा नागरिकांनी सातपायरी येथे पकडून यथेच्छ चोप दिला व त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले असून सर्वांना देवगड ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

 

नांदेडधील सात तरूण गाडी करून देवगडमध्ये मंगळवारी फिरण्यासाठी आले सायंकाळी साडेपाच वाजण्याचा सुमारास ते आनंदवाडीकडे जात होते पाच वाजण्याच्या दरम्यान कॉलेजहून बाजारपेठेत जात असलेल्या युवतीला त्यांनी आनंदवाडीकडे जाण्याचा मार्ग विचारला यावेळी तिने तो मार्ग दाखविला मात्र ते तिला गाडीत बसण्यास सांगत होते यावेळी तिने नकार दिला.मात्र मद्यधुंद स्थितीत असलेल्या तरूणांनी तिची छेडछाड करण्यास सुरूवात केली यावेळी तिने घाबरून बाजारपेठेच्या दिशेने धाव घेतली हा प्रकार बाजारपेठेतील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्या तरूणांना पकडून धुलाई करण्यास सुरूवात केली दरम्यान दोघेजण सापडले तर उर्वरीत पाचजण पसार झाले.त्या दोघांची वरात देवगड पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आली.यावेळी पोलिस हवालदार उदय शिरगावकर, पो.कॉ.प्रसाद आचरेकर, निलेश पाटील यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी पोलिसांसमोरच धिंगाणा घालण्यास सुरूवात केली यावेळी पोलिसांनी पोलिसी हिसका दाखविण्यास सुरूवात केल्यानंतर ते पोलिसांवरच उलटलें.यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांवर त्यांनी हात उचलला मात्र पोलिसांनी त्यांना चांगला चोप दिला.

दरम्यान ती युवती व तिचे पालकही पोलिस स्टेशमध्ये दाखल झाले होते.

यावेळी तिसरा युवकहिी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला त्यांनी आम्ही दोघेजण वसई पोलिस वाहतुक शाखेत र्कारत असल्याचे पोलिस निरिक्षक अरूण देवकर यांना सांगीतले.यामुळे या घटनेत दोन पोलिस कर्मचारी असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली असून यातील पळून गेलेल्या उर्वरील तीन जणांना ग्रामस्थांनी सातपायरी येथे असल्याचे समजताच तेथे जावून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.या सर्वांची मेडीकल तपासणीसाठी पोलिसांनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असून ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे मात्र वैद्यकीय तपासणी अंती ते स्पष्ट होणार आहे.दरम्यान याबाबतची पोलिस कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.