बाळा आंगणे याना “भांडुप भूषण” पुरस्कार जाहीर!

“Bhandup Bhushan” award announced for Bala Angane!

मसुरे | झुंजार पेडणेकर : आंगणेवाडीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. सिताराम शांताराम उर्फ बाळा आंगणे यांना ‘भांडूप भूषण’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने भांडुप मुंबई येथे राहताना अनेक विविध उपक्रम आंगणे यांनी भांडुप येथे राबविले होते. महाराष्ट्र दिन व सिंधुदूर्ग स्थापना दिनाचे औचित्य साधून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी कोकण विकास आघाडी आणि भांडूप विधानसभा, भाजप यांच्या तर्फे सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते सदर पुरस्कार वितरित होईल. बाळा आंगणे याना पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल आंगणेवाडी विकास मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे,मधुकर आंगणे, छोटू आंगणे, अनंत आंगणे, काका आंगणे, शशी आंगणे, सुनील आंगणे, नंदू आंगणे, बाबू आंगणे, बाळा आंगणे यांनी अभिनंदन केले आहे.