बोरथडे गावातील उबाठाचे शाखा प्रमुख बुवा राणे यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेते किरण सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरथडे गावचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शाखाप्रमुख बुवा राणे यांनी उबाठाला अखेरचा जय महाराष्ट्र करत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

किरण सामंत यांच्या कामावर प्रेरित होऊन आणि त्यांच्या कामाची पद्धत बघून बुवा राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बुवा राणे हे शिवसेनेचे या गावातील प्रमुख कार्यकर्ते होते.त्यांच्या जाण्याने उबाठा गटाला खिंडार पडला असून शिवसेनेची ताकद वाढली आहे. किरण सामंत यांच्या सारखे नेतृत्व जर ५ वर्षा पूर्वी मिळाले असते तर लांजाचे विकासात्मक परिवर्तन झाले असते. यावेळी गावाच्या विकासासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले.
यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, मुन्ना खामकर तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.