राजापुर तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामांना दिड कोटींचा निधी मंजूर

 

 

भाजपा महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे यांनी 

ना. रविंद्र चव्हाण ना. गिरिष महाजन यांचे मानले आभार

राजापूर । प्रतिनिधी : भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध प्रलंबित विकास कामांना शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २५-१५ कार्यक्रमांतर्गत सुमारे दिड कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती सौ. मराठे यांनी दिली आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत यासाठी सौ. मराठे यांनी पाठपुरावा केला होता. ना. चव्हाण यांनी यासाठी ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांना सदरची कामे प्राधान्याने मंजूर करवित असे कळविले होते. ना. महाजन यांनी देखील याची तातडीने दखल घेत राजापूर तालुक्यातील विविध विकास कामांना सुमारे दिड कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल दोन्ही मंत्री महोदयांचे सौ. मराठे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

या कामांमध्ये मौजे कोतापूर येथील मुख्य रस्ता ते नवरे वठार रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करणे १५ लाख, मौजे तारळ येथील वावळे खाजणवाडी (हनुमान मंदिर) ते प्रकाश वाघधरे घरा पर्यतचा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १७ लाख, ग्रा.पं. कोकंडगाव ता. संगमेश्वर येथील खालची बाजर पेठ स्मशानभूमी नवीन बांधणे, बाजूला संरक्षण भिंत बांधणे व त्या आवारात सोलर लाईट बसविणे १५ लाख, मौजे कोंडसर बुद्रुक आगरवाडी रस्ता सुधारणा करणे १० लाख, मौजे कोण कोंडसर तालुका राजापूर तावडे भवन बेनगी रस्ता सुधारणा करणे १० लाख, कोंडसर बुद्रुक ग्रामपंचायत येथील बेणी मधील पांढरा आंबा ते वारीकवाडी रस्ता सुधारण करणे १० लाख, मौजे कोंडसरखुर्द शेडेकर वाडी येथे संरक्षण भिंत बांधणे १० लाख, मौजे हातीवले येथील बाबू पिंगळे घरत ते शामसुंदर घर हा रस्ता खडीकरण-डांबरीकरण करणे ५ लाख, मौजे भालवली येथे लोटलीकर यांच्या घराजवळील रस्ता सुधारणा करणे ५ लाख, मौजे कोंडीवले गोतावडे वाडी नेवरेकर घराकडे जाणारा रस्ता सुधारणा, खडीकरण, डांबरीकरण करणे ८ लाख, मौजे दले मठवारडी सिद्धश्वर मंदिर ते साखरकर घर खडीकरण, डांबरीकरण करणे १० लाख, मौजे नेरके येथे मोहिते यांच्या घराजवळ संरक्षक भिंत बांधणे ५ लाख, मौजे कुंभवडे मौजे उपळे मुख्य रस्ता ते सोसायटी येथे गटार व मोऱ्या बांधणे ५ लाख, मौजे फुफेवाडी येथे नवलादेमंदिर येथे संरक्षक भिंत बांधणे ५ लाख, मौजे जैतापूर येथील उदय भोपळे घर ते साई मंदिर चव्हाटवाडी गटार बांधणे ५ लाख, मौजे गुरववाडी येथे गटार बांधकाम करणे ५ लाख, मौजे नेरके येथील विश्वनाथ बेहरे ते महेश विचारे यांच्या घरापर्यंतचा रस्ता सुधारणा करणे ५ लाख या कामांचा समावेश आहे.

ना. चव्हाण व ना .गिरीश महाजन मंत्री ग्रामविकास यांच्या माध्यमातुन राजापूरातील या महत्वपुर्ण विकास कामांना दीड कोटीचा निधी मंजूर झाल्याबद्दल सौ. शिल्पा मराठे यांनी ना चव्हाण व ना. गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत. तर सौ. शिल्पा मराठे यांनी यासाठी केलेल्या प्रयत्न् व पाठपुराव्याबद्दल त्यांचेही अभिनंदन होत आहे.