मनाचे श्लोक पठण स्पर्धेत हर्षदा नाईक प्रथम

 

भारतीय सुराज्य संस्था शाखा मडुरा संस्थेचे आयोजन

बांदा : प्रतिनिधी :    मडूरा येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत आयोजित मनाचे श्लोक पठण स्पर्धेत हर्षदा नाईक हीने प्रथम क्रमांक पटकाविला. श्रेया देऊलकर द्वितीय तर राजवर्धन सावळ याने तृतीय क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

श्री समर्थ सद्गुरु गणपत महाराज कन्नूर बिजापूरच्या भारतीय सुराज्य संस्था शाखा मडूरा यांच्या वतीने शारदोत्सव निमित्त मनाचे श्लोक पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रशालेतील १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत हर्षदा नाईक प्रथम, श्रेया देऊलकर द्वितीय, राजवर्धन सावळ तृतीय तर चैत्रा नाईक हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. संस्थेच्या वतीने सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात आली. यावेळी रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, शालेय समिती सदस्य भिकाजी धुरी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सायली परब, संस्थेचे गणेश नाईक, सखाराम नाईक, गुरुनाथ खोबरेकर, बाळकृष्ण प्रभू, किशोर देऊलकर, गजानन नाईक, अशोक कुबल, एकनाथ भोगटे, कौशल नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सावंत भोसले यांनी केले. या कार्यक्रमाला प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतरेकर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.