एकच निर्धार — सावंतवाडी विधानसभेचा शेतकरी आमदार

 

शेतकरी फळबागायतदार संघटनेच्या बैठकीत निर्णय

कोअर कमिटी गठीत

बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभेसाठी शेतकरी फळबागायतदार संघाचा उमेदवार देण्याच्या प्रस्तावावर एकमत झाले. शेतकरी फळबागायतदार संघाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी कोअर कमिटीही गठीत करण्यात आली. रविवार २७ ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत उमेदवार निश्चित करून सोमवार २८ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला. यावेळी ‘एकच निर्धार — शेतकरी आमदार’ अशा घोषणा देण्यात आल्या.

 

 

 

बांदा विविध कार्यकारी संस्थेच्या सभागृहात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनाची एकत्रित बैठक संपन्न झाली. सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने उमेदवार देण्याच्या विचारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच योग्य उमेदवाराची निवड, निवडणूक प्रक्रिया, व्यूहरचना करण्यासाठी कोअर कमिटी निर्गठीत करण्यात आली. सदर कमिटी शेतकरी संघटनेचा संभाव्य उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा २७ ऑक्टोबर रोजी करून २८ रोजी शेतकरी संघटनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल असे अध्यक्ष विलास सावंत यांनी जाहीर केले.

 

 

 

 

बैठकीची प्रस्थावना सुरेश गावडे यांनी केली. यावेळी विलास सावंत, वेंगुर्ला नगरपरिषदचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांनी मार्गदर्शन केले. आभार संजय देसाई यांनी मानले. यावेळी सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे संचालक दिवाकर म्हावंळणकर, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, सरपंच संघटनेचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रवीण परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघ अध्यक्ष संजय देसाई, सचिव अशोक सावंत, खजिनदार आकाश नारसुले, प्रगत शेतकरी प्रणव नाडकर्णी, उद्योजक नारायण गावडे, चंद्रशेखर देसाई, जयप्रकाश चमणकर, शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटना अध्यक्ष राजेंद्र अंदुर्लकर, सचिव हनुमंत गवंडी, सदस्य भानुदास गवंडी, शेखर नाईक, शरद आरोसकर, वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, रत्नदीप धुरी, प्रगत आंबा काजु बागायतदार संघटना आणि संशोधक विलास ठाकूर, सरपंच प्रकाश गाडेकर, जिल्हा नर्सरी संघटना शिवराम आरोलकर, समीर सावंत, सुहास सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, लाकूड व्यापारी संघटना सदस्य शिवाजी गवस आदी उपस्थित होते.