आचरा–अर्जुन बापर्डेकर : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या संस्थेतर्फे शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सुपारी ठीक तीन वाजता राम रक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले आहे .सदर स्पर्धा तिसरी ते पाचवी आचरा शाळा मर्यादित आहे. यासाठी रामरक्षाचे पहिले 10 श्लोक पाठांतर करायचे आहेत. प्रथम क्रमांक 151, द्वितीय क्रमांक 100, तृतीय क्रमांक 75 , दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी 50 तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. नाव नोंदणीची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर पासून अधिक माहितीसाठी संस्थेच्या ग्रंथपाल सौ.विनिता कांबळे 0 23 65 246 0 17 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











