वैभववाडी येथे सत्संग सोहळा संपन्न
वैभववाडी | प्रतिनिधी : निरंकारी मिशन हे आध्यात्मिक विचारधारा आहे. पुरातन साधुसंतांच्या शिकवणीवर चालणारे हे मिशन आहे. पृथ्वीतलावर येऊन कसं जगायचं, काय करायचं हेच यातून शिकविले जाते. जीवनात सुख, आनंद उपभोगता यावे, यासाठी सत्संगमध्ये प्रत्येकाने सामील झाले पाहिजे. असे प्रतिपादन ज्ञानप्रचारक परमपूज्य सुनील हतपले मुंबई यांनी केले. वैभववाडी बाजारपेठ दत्त मंदिर पटांगणावर अध्यात्मिक सत्संग सोहळा संपन्न झाला. यावेळी सुनील हतपले यांनी प्रवचनातून भक्तगणांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. हतपले पुढे म्हणाले, हा कार्यक्रम फक्त निरंकारी मंडळींसाठी आहे असा समज चुकीचा आहे. हा सत्संग सोहळा प्रत्येकासाठी आहे. यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. गावागावात असे कार्यक्रम झाले पाहिजेत. भक्तीची रीत या मिशन मधून शिकवली जाते. सत्याच्या वाटेने चालण्यासाठी मिशनमध्ये सहभागी व्हा. असे आवाहन हातपले यांनी केले. दत्त मंदिराच्या प्रांगणात बुधवारी सायंकाळी प. पू. सुनिल हतपले जी (मुंबई) यांच्या पावण उपस्थितीमध्ये विशाल आध्यात्मिक सत्संग संपन्न झाला. त्यांनी आपल्या प्रवचनाद्वारे उपस्थित भावीकांना मनुष्य जीवनाची विशेषता, संत निरंकारी मिशनचा इतिहास व उद्देश यावर विशेष भाष्य केले. तसेच आपला तो देव एक करूनी घ्यावा । तेणे विना जीवा सुख नाही । या पुरातन संतांच्या अभंगवाणी द्वारे निरंकारी मिशन माणसाला भक्ती मार्गाच रहस्य समजवत असल्याचे सांगितले. या सत्संग सोहळ्याकरिता मुंबई, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून अनेक निरंकारी भक्तमंडळी उपस्थित होते. तसेच श्री. जयेंद्र रावराणे, नरेंद्र कोलते व शांताराम रावराणे आदि मान्यवर उपस्थित होते. सदर सत्संग कार्यक्रमाला जवळपास तिनशे भक्तगण उपस्थित होते.











