मंडणगड | प्रतिनिधी : रत्नागिरी तायक्वांडो असोसिएशनच्या मान्यतेने तायक्वांडो स्पोर्ट्स अकॅडमी आॅफ दापोली आयोजित 16 वी क्युरोगी व 10 वी पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा सन 2023 सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह नवछात्रालय, शिवाजी नगर, दापोली या ठिकाणी दिनांक 25 ते 27 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मंडणगड तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या 19 खेळाडूनी सहभाग नोंदवून 20 पदके जिंकून आपला दबदबा कायम राखला आहे. हे यष संपादन केलेल्या सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षणकांचे मंडणगड तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेमध्ये स्पेशल कॅटॅगरीमध्ये हितांश रविंद्र पाटील याने सुवर्ण, कुंतल वैभव कोकाटे – रौप्य,श्रेया शेखर कदम हिने एक रौप्य व सबज्युनिअर गटात एक कास्य, सबज्युनियर गटात प्रशिक आदेश मर्चंडे – एक रौप्य व एक कास्य, आराध्या अमोल कोलबेकर – रौप्य, स्वेच्छा शुभेंद्र सागवेकर – कास्य, कॅडेड गटामध्ये आरुषी चंद्रकांत पंदिरकर – रौप्य, आर्थव अनंत भोपने – कास्य, ज्युनिअर गटातून आयुश उपेंद्र दळवी – सुवर्ण, पलक वैभव कोकाटे – रौप्य, प्रणव प्रमोद जाधव – कास्य, स्वराज सुनिल एैनकर – कास्य, दिक्षा संदिप येलवे – कास्य तर सिनिअर गटात मयुरी ज्ञानदेव खांबे – सुवर्ण, तृशाली भरत चव्हाण- सुवर्ण, शुभम संजय करावडे – सुवर्ण, अभिशेक अशोक मर्चंडे – कास्य, सिनियर पुमसे गटात काजल लोखंडे – सुवर्ण, विश्वदास लोखंडे – सुवर्ण यांनी पदके मिळवूण यश संपादन केले आाहे. या स्पर्धेत संघ प्रशिक्षक म्हणून सौ. काजल लोखंडे व अभिशेक मर्चंडे यांनी काम पाहिले.या सर्व खेळाडूंना तालुका अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या यशस्वी खेळाडूंचे रत्नागिरी जिल्हा तायक्वाडो असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश करारा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोशाध्यक्ष शशांक घडशी, सचिव लक्ष्मण करारा, मंडणगड तालुका तायक्वाडो अॅकॅडमीचे अध्यक्ष श्री. प्रशांत सुर्वे, क्लब अध्यक्ष आदेश मर्चंडे, सौ. दिपिका घोसाळक, रविंद्र मिश्रा, जयराम कोटेरा, पंचप्रमुख भरत करारा, स्पर्धा आयोजक दापोली तायक्वाॅडो अॅकॅडमीचे प्रमुख पदाधिकारी स्वप्नील येलवे, संकेत जालगावकर, गणेश पवार, अनिकेत पाथे, संचिन गायकवाड यांनी विशेष कौतुक केले आहे.











