वेंगुर्ले हॉस्पिटल नाका कला -क्रीडा मंडळाच्या लावणी नृत्य स्पर्धेला उत्तम प्रतिसाद…

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी : दिपावली शो टाइम निमित्त हॉस्पिटल नाका कला -क्रीडा मंडळाच्या वतीने यावर्षी भरगच्च कार्यक्रम सादर करण्यात आले. मंडळाचे कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष होते. लावणी नृत्य स्पर्धेने कार्यक्रमाला रंगत आली. लावणी स्पर्धेत नेहा जाधव हीने प्रथम क्रमांक पटकाविला. तिच्या सह विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

 

 

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पूर्वा मेस्त्री, तृतीय क्रमांक नंदिनी बिले तर उत्तेजनार्थ क्रमांक दुर्वा पावसकर व रमाकांत जाधव यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण श्री. रामा पोळजी, भक्ती पोकळे /जामसंडेकर व गौरी बांदेकर /सावंत यांनी केले. तर कार्यक्रमाचे निवेदन श्री. रवी कुडाळकर यांनी केले. यावेळी अध्यक्ष मनीषा सातार्डेकर, उपाध्यक्ष महेंद्र गावडे, सचिव योगेश गोवेकर,सहसचिव रामचंद्र सावंत,खजिनदार आनंद कोळेकर,सहखजिनदार राहुल वेंगुर्लेकर, सल्लागार विधाता सावंत,प्रफुल्ल सावंत,करण निरावडेकर,सौरभ भोसले
जयंत सावंत, कुशल निरावडेकर सौरभ धुरी,प्रशांत गावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.